संत ज्ञानेश्वर लिखित अमृतानुभव या ग्रंथाला समर्पित संकेतस्थळ

संत ज्ञानेश्वर यांचा जीवनपट

ज्ञानदेव महाराजांचें महाराष्ट्र्संतमंडळात अनेक बाजूंनी अत्यंत महत्व आहे. तत्त्वज्ञानी, प्रेमळ ईश्वरभक्त, सामाजिक नेते, अलौकिक योगी, ब्रह्मचारी, धर्मसंरक्षक आणि प्रासादिक ग्रंथकार, अशा अनेक नात्यांनी त्यांची निर्मळ किर्ती आज अखंडपणे दिव्य घोषाने महाराष्ट्रात आणि जगात दुमदुमत राहिली आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथाचे कर्ते आणि वैष्णवसंप्रदायाचे प्रवर्तक या नात्याने मननशील ज्ञानीजनांच्या, तसेच भोळ्या भाविक वारकऱ्यांच्याही जिव्हाळ्याशी ते एकजीव झाले आहेत.

ज्ञानदेवांचे वडील विठ्ठलपंत हे गोदातीरावरील पैठणजवळील आपेगावच्या गोविंदपंत कुलकर्ण्यांचे चिरंजीव. अल्पवयातच वेदाध्ययन व शास्त्राध्ययन करून विठ्ठलपंत मोठे ज्ञानसंपन्न व वैराग्यशील ईश्वरभक्त झाले. संसारात त्यांचे मन रमेना. तीर्थक्षेत्रींच्या यात्रा कराव्या, भक्तमंडळींच्या सहवासात रमावे, आणि ईश्वरसेवेत आयुष्य सार्थकी लावावे, अशी सारखी त्यांच्या मनाला ओढ लागली होती. यामुळे कुमारावस्थेतच ते तीर्थाटनाकरिता घराबाहेर पडले, आणि निरनिराळ्या क्षेत्रांचे दर्शन घेत घेत पुण्याजवळच्या आळंदी या गावी आले. आळंदीस सिधोपंत कुलकर्णी नावाचे एक सुखवस्तु व भाविक सज्जन राहात होते. सिद्धेश्वराच्या मंदिरात उतरलेल्या या तरुण पांथस्थ ब्राह्मणाची ती ज्ञानसंपन्न मुद्रा , निर्मळ वॄत्ती आणि कर्मनिष्ट आचरण पाहून सिधोपंतांनी आपल्या उपवर कन्येचे त्याच्याशी लग्न लावून देण्याचे ठरवले. त्याप्रमाणे विठ्ठलपंताजवळ आपला विचार बोलून दाखवला. वैराग्यशील विठ्ठलपंतानी या गोष्टीस आपली सहमती दर्शवली नाही; पण लवकरच त्या मुलीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्याबद्दल स्वप्नदॄष्टांत झाला, आणि हाच ईश्वरी संकेत असावा असे समजून विठ्ठलपंतानी सिधोपंतांच्या मुलीशी, रुक्मिणीशी विधिवत विवाह करून संसार थाटला.

अमॄताचा अनुभव

अमॄताचा अनुभव |
सांगतसे ज्ञानदेव |
माझा चाकाटला जीव | त्याचे कौतुक सांगतो ||१||

सद्‍गुरुंनी सांगितले |
अनुभवाला जे आले |
सांग तुझ्या मनातले | ज्ञानदेवा इतरांना ||२||

गुरुदेवांचे ऐकले |
ज्ञानदेवांनी लिहिले |

नित्यनूतन अमृतानुभव

श्री हेमंत राजाराम यांनी नव्या छंदात उस्फूर्तपणे रचलेला `अमृताचा अनुभव' हा ग्रंथ माझ्या वाचनात आला, आणि वाटले भवभूती म्हणाला ते खरेच. भवभूती काय म्हणाला होता?

अमृतानुभवाचा छंदानुवाद

मृण्मय इंद्रियांना चिन्मय अनुभवामृत देणार्‍या श्री ज्ञानदेवांचा 'अमृतानुभव' हा आकाराने लहान परंतू अद्वितीय ग्रंथ. निखळ आत्मानुभवाला ऐहिक जीवनातील कुठलीच उपाधी शोभत नाही.

ग्रंथपरिहार

परी गा निवृत्तिराया । हातातळीं सुखविलें तूं या ।
तरी निवांतचि मियां । भोगावें कीं तें ॥१॥

परी महेशें सूर्याहातीं । दिधली तेजाची सुती ।
तया भासा अंतर्वर्ती । जगचि केलें ॥२॥

चंद्रासि अमृत घातलें । तें तयाचि कायि येतुलें ।

जीवन्मुक्तदशाकथन

आता आमोद सुनास जालें । श्रुतीसि श्रवण रिघाले ।
आरिसे उठले । लोचनेसी ॥१॥

आपुलेनि समीरपणें । वेल्हावती विंजणे ।
कीं माथेचि चांफेपणें । बहकताती ॥२॥

जिव्हा लोधली रसें । कमळ सूर्यपणें विकाशे ।
चकोरचि जैसे । चंद्रमा झाले ॥३॥

ज्ञानखंडन

तैसें आमुचेनि नावें । अज्ञानाचें ज्ञानही नव्हे ।
आम्हालागीं गुरुदेवें । आम्हीच केलों ॥१॥

परी आम्हा आम्ही आहों । तें कैसें पाहो जावों ।
तंव काय कीजे ठावो । लाजिजे ऐसा ॥२॥

हा ठावोवरी गुरुरायें । नांदविलों उवायें ।

अज्ञानखंडन

येर्‍हवीं तरी अज्ञाना । जैं ज्ञानाची नसे क्षोभणा ।
तैं तरि काना । खालीच दडे ॥१॥

अंडसोनि अंधारीं । खद्योत दीप्ति शिरी ।
तैसें लटिकेंवरी । अनादि होय ॥२॥

जैसी स्वप्ना स्वप्नीं महिमा । तमीं मानु असे तमा ।

शब्दखंडन

बाप उपयोगी शब्दु । स्मरणदानीं प्रसिध्दु ।
अमूर्ताचा विशदु । आरिसा नव्हे ? ॥१॥

पहातें अरिसा पाहे । तेथें कांहींचि नवल नव्हे ।
परि दर्पणें येणें होये । न पाहतें, पाह्तें ॥२॥

वडिला अव्यक्ताचिया वंशा । उद्योत्कारु सूर्य जैसा ।

Syndicate content

लेखन लिपी

देवनागरी / मराठी
Roman / English

F12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...

येण्याची नोंद