मृण्मय इंद्रियांना चिन्मय अनुभवामृत देणार्या श्री ज्ञानदेवांचा 'अमृतानुभव' हा आकाराने लहान परंतू अद्वितीय ग्रंथ. निखळ आत्मानुभवाला ऐहिक जीवनातील कुठलीच उपाधी शोभत नाही. अशा अनुभवाला सामोरे जाताना एक्-एक करून सारे पाश सोडवत त्या केवलप्रदेशात जावे लागेल.तात्त्विक विचारांचे खंडणमंडण आणि सिद्धांतांचा गद्य उहापोह करण्यापेक्षा त्या तरल अमृत अनुभवाला ओवी छंदातील उत्कट काव्यानुभवात रूपांतरित करणार्या संत श्री ज्ञानदेवांच्या अनुभवामृताने आजवर अनेकांना मोहिनी घातली आहे. त्यातलाच मी एक.
अमृतानुभव वाचताना मिळालेला आनंद आपल्याप्रमाणेच इतरांनाही मिळावा या उत्कट भावनेतून 'अमृताचा अनुभव' अनावरपणे रूपांतरित झाला. ही, विश्वकल्याणाचे पसायदान मागणार्या श्री ज्ञानदेवांची प्रेरणा.
हेमंत राजाराम.
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना